SHOW / EPISODE

Prabhu Parmananda Prahu Parmanada By Dattaprasad Joshi

4m | Mar 22, 2024

प्रभू परमानंदा प्रभू परमानंदा

तव प्रेमाच्या मज लागो छंदा

 

इथे सगुणरूप उभा देवराया

शरण शरण शरण श्रीगुरुपाया

तोच करी सबळ भेदण्या आपदा

प्रभू परमानंदा प्रभू परमानंदा

 

तो प्रेमाने दावी सत्य ईश

तो संभ्रमाचे उतरवी विष

स्पष्ट बोधाने मोडी मनाच्या फ़ंदा

प्रभू परमानंदा प्रभू परमानंदा

 

परमानंदासी जोडुनी रहावे

परमानंद चरणी प्रेम वाहवावे

कृपा करी अभंग आनंदकंदा

प्रभू परमानंदा प्रभू परमानंदा

 

।। हरी ओम तत सत परमानंद।।

Paused
Audio Player Image
Anandache Dohi
Loading...